Wednesday, October 20, 2010

फुले वेचिता...काल माझे एक स्नेही श्री.उदय पै यांच्याकडे गेलो असता त्यानी मला नुकत्याच झालेल्या ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्या 'मोगरा फुलला' या चित्रमालिकेच्या प्रदर्शनाची एक पुस्तिका दिली.विषय होता संत परंपरा.मी त्यावेळी मुंबई बाहेर असल्याने या संधीला मुकल्याची खंत त्याना बोलुन दाखवली. त्यानी भेट म्हणून दिलेलं ते ब्रोशर घेउन घरी आलो.
रात्री नेहमी प्रमाणे काम करत असताना माझा चुकुन डोळा लागला. अचानक जाग आली तेव्हा रात्रीचा १ वाजला होता. टेबललॅंपच्या प्रकाशात ते ब्रोशर..आणि त्यावरील ज्ञानेश्वर माउलींचे पेंटीग अतिशय सुरेख दिसत होतं..पहाता पहाता त्या चित्राने जणू खेचुन घेतलं.ज्ञानेश्वरांची ती भावसमाधी त्या निर्गुण निराकाराच्या अस्तित्वाची जाणिव करुन देणारं ते अवकाश.ज्ञाताच्या पलिकडील अज्ञाताच्या पोकळीकडे नेणारी ती चौकट.त्या सा-यात हरवल्या सारखी स्थिती झाली अचानक काही सुचतय असं वाटलं मी घाईनं कागद ओढ्ले एक ओळ दोन ओळी असं करता अगदी पाठ असल्यासारखं काव्य एक हाती लिहून झालं..वाचुन पाहिलं अन धक्का बसला ..ओळी अशा होत्या.
ओघळता अमृतवेलू
बहरची अनावर झाला
मोहरला आत्मारामू
गंधाळुनी परिसर गेला

पाझरले ब्रम्हज्ञान
काया मग मिथ्या झाली
आत्म्याचा नाद अनाहत
ब्रम्हांडा भेदूनी गेला

ऊंबराही अज्ञाताचा
तेजाने उजळे अवघा
ज्ञानाचा साक्षात्कारू
त्या ज्ञानियासी झाला...

हे सारं आलं कुठुन ? नेहमीचाच धक्का बसला.असं म्हणतात विचार आणि भावना या अमूर्त असल्या तरी त्यांना एक भाषा असते आणि त्याच विचारांना प्रत्यक्षाची जाणीव मन:पटलवर उमटविणारे दृश्य असते. हेच नेमके मूर्त स्वरूपात येते ते काव्यातून, साहित्यातून तर कधी चित्र-शिल्पातून. कामतांनी जे चित्रातून उभं केलं तेच माझ्या हातून शब्दरुपाने साकार झालं असावं.

23 comments:

 1. दादा....अप्रतिम सुंदर रचना.....!
  विश्वास नाही बसणार कि हि रचना एक हाती लिहिली गेली आहे....!
  शब्दरूपात तू जे काही साकारले आहेस ते निव्वळ अप्रतिम आहे.......खूप सुंदर.....!!

  ReplyDelete
 2. Guruji, Aplyakade Dayvi denagi hotich ata gurumaulichi kripa pun zhali, Tusi great ho!

  ReplyDelete
 3. खूप छान काव्य आहे गुरु..! ज्ञानदेवांचा परिसस्पर्श झाल्यासारखं तेजोमय ! विचार व्यक्त होण्याचे मूर्त माध्यम भाषा/दृश्य असले तरी अमूर्त विचारही ताकदीचेच हवेत. तेव्हाच अशी अलौकिक चित्र/शब्दशिल्प उभी राहतात, नाही का..

  कामत सरांनी कुंचल्यातून आकारलेला विचार, गुरुच्या शब्दांतून साकार !!

  ReplyDelete
 4. कशी करू तुझी स्तुती ???? शब्दच अपूरे आहेत गुरू....
  असाच लिहीत रहा..... ज्ञानेश्वर माउली आणि देवी सरस्वती अशीच नेहमी तुझ्यावर प्रसन्न राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....

  ReplyDelete
 5. Khupach Sundar rachana ahey hi..... I Bhavana vyakta karayla Nemkya weli shabdancha batwa mokala asato tasa jhalay...

  ReplyDelete
 6. tu jabardast aahes re......tujhya kadun ajun kay kay lihun ghenar aahe dev hey tyalach mahit....keep it up....

  ReplyDelete
 7. गुरुदा.. खूपच छान !

  ReplyDelete
 8. हे मानवाचे परम भाग्य आहे , की तेजाने भरलेले शब्द कोणे एके काळी लिहिले गेले
  आणि आजही ते शब्द तितकेच प्रवाही आहेत . हा समृद्ध वारसा असाच चालू राहो ! !

  ReplyDelete
 9. या पोस्टसाठी मन:पूर्वक आभार!

  ReplyDelete
 10. तुम्ही सुद्धा समाधीमधूनच जागे झाला होता म्हणून असं बहारदार काव्य स्फुरलं. खुपच छान.

  ReplyDelete
 11. Tumhi kharach great aahat, atishay sundar !!!

  ReplyDelete
 12. tumhala dad denyasathi shabd apure aahet.sarv shbd tumchya mohinit tallin aahet.

  ReplyDelete
 13. ज्ञात-अज्ञाताच्या खिडकीवर पडलेला कवडसा आहे जणू ही रचना....
  "मी"पणा त्यात लोपला...विरघळून गेला...!

  ReplyDelete
 14. pharch chhan, devachi denagi mhanje tumchi lekhani, ani tumchi lekhani mhanje sakshat sarswati..

  ReplyDelete
 15. Great to read your posts sir......Really you write very nice things.....keep going....you are the Pole Star showing way to people like us.....thanks for being there....

  ReplyDelete
 16. या सुंदर शब्दांना एक अशीच चाल लावा अणि एक अप्रतिम संगमात संगीत प्रेमी नहावेत ही इच्छा

  ReplyDelete
 17. Mitra mala asa vatta, tujhe antarman he nehmi shbda rupane tujhyakadun vyakta hot asta. Khara sangu majhya mate sagla kahi sthir ahe, devachi murti aani shabdahi, fakta ya madhla nata shodhla tujhya antarmanane.

  Keep it up. Nice doing and inspiring too.

  ReplyDelete
 18. I am not new to blogging and really value your blog. There is much prime subject that peaks my interest. I am going to bookmark your blog and keep checking you out. Wish you good luck.

  Some people are too smart to be confined to the classroom walls! Here's a look at other famous school/college dropouts.
  Check out here for Smart People

  ReplyDelete
 19. अप्रतिम .. !!!

  ReplyDelete
 20. khupach mast GURU DADA MASTCH RE EK TAR TE CHITRACH KHUP CHAN N TYACHA SHABDA ROOP TUMI DILAT MASTCH KRUPA AHE BAGHA SADGURU MAULINCHI AJUN KAY
  KHUP KHUP SHUBHECCHA!!!

  ReplyDelete