Monday, September 27, 2010

कुठे शोधीशी रामेश्वर अन....




आठ मैल पायी चाललो मग सात तास रांगेत उभा राहुन दर्शनाला पोचलो तर xx च्यानी दोन मिन्टात ढकलून दिलं.साधे हात जोडायचीही उसंत नाय रे दिली.माझा एक स्नेही मला सांगत होता.मी म्हटलं गरज काय होती तुला जायची?
परेमेश्वर म्हण्जे निर्गुण निराकार हे मान्य?
तो म्हणाला,‘मान्य..!’
मग तो ह्या भक्तीच्या सुपर्मारकेट्स मधे मिळेल का?
‘म्हणजे?’ तो बावरला,
मला सांग हल्लीची ही सो कॉल्ड देवस्थानं म्हणजे दुसरं काय असतं?मुठभर बड्व्यानी एखाद्या देवाला तावडीत पकडावं त्याला सोन्या मोत्यानं मढ्वावं आणि बाजारात बसवावं?मग त्याच्या नावाने जाहिरात बाजी करुन ख्च्चून पैसा ओढणारी आपली दुकानं थाटावीत?त्यांच्या श्रीमंतीचं हिडीस प्रदर्शन भरवावं.सो कॉल्ड भक्त गण ही मग बाजारात गेल्या प्रमाणे जाहिराती आणि लोकप्रियता पाहुन दुकान निवडणार आणि पाच नारळांच्या बदल्यात नोकरी किलोभर मोद्कांच्या बदल्यात छोकरी दहा तोळे सोन्याच्या बदल्यात एखादं घ्सघशीत कॉन्टॅक्ट असली निर्लज्ज डील्स त्या जगन्नीयंत्या कडे करणार..मग तिथे जमणा-या मलिद्याच्या मालकी हक्का वरुन अधीकारांवरुन या भक्तिच्या च्या दलालात रंगणारं राजकारण . त्यात वाद करुन त्यात एकमेकांचे गळे चिरण्यापर्यंत जाणारी त्यांची लालसा.थोड्क्यात जिथे स्वार्थ,लोभ,मोह,द्वेश,इर्षा अशा अनेक भावनांचा महासंग्राम चाललाय अशा ठिकाणी तो सापडेल का?
खरंच रे.नाहीच सापडणार.पण मग कुठे सापडेल तो?
माझ्या मते निस्वार्थ सेवेतुन मिळणा-या आनंदाची परीसीमा म्हणजे परमेश्वर प्राप्ती.कुठल्याही स्वार्थी हेतू विना आपण केवळ माणूस्कीच्या नात्याने आपण एखाद्याच्या गरजवंताच्या,पिडीताच्या मदतीला धावून जातो.प्रसंगी आपलं कसब पणाला लावतो.अशावेळी ते काम यशस्वी पणे तडीस नेल्या नंतर त्या व्यक्तीच्या कृतार्थ नजरेत तरळणा-या आनंदाश्रुत पहा.तुला पर्मेश्वराचं प्रतिबींब दिसेल.तो दुसरा तिसरा कुणीच नसतो तुमचंच प्रतीबींब असतं ते.पण काही क्षणांकरता त्याच्या करता तुम्ही परमेश्वर झालेले असता.
खरं तर देव दानव आणि मानव तिघंही अंशात्मक रुपाने आपल्यात असतातच.पण ज्या क्षणी तुम्ही अशी निस्वार्थ सेवकरता झटत असता तेव्हा तुमच्या नकळात हा परमेश्वराचा अंश मोठामोठा होत जातो..तुम्हाला तो दिसतो त्या कृतज्ञ डोळ्यात केवळ एकच क्षण. त्या क्षणा करता झटावं. एकदा का त्या क्षणात होणा-या त्या जिवंत अनूभूतीची गोडी तुम्हाला कळली ना की कुठल्याही भक्तीच्या सुपरमार्केट मधे तासंतास ताटकळण्याची गरज उरणार नाही.

No comments:

Post a Comment