Wednesday, September 29, 2010

रिस्की` क्लिक.'
कोकणातला पाऊस बराचसा टिपून झाला तरी काही गोष्टी राहुनच गेल्या होत्या त्यातलाच एक किंग फिशर. त्याच्या शोधात निघालो. सोबत हौशी दोघेजण, त्यातल्याच एकाने अचानक अतिशय चोरट्या आवाजात खबर दिली.पलिकडे पहा मी नजर फिरवली थोड्याशा मोकळ्या जागेत मला तो दिसला `गोल्ड्न ब्यूटी' माझ्या तोंडुन निघुन गेलं कारण किंचित सुर्यकिरणात तो नागराज फण्यावर १० चा आकडा मिरवत तसाच चमकत होता.माझ्या कॅमे-याला फिक्स लेन्स होती अन ती बदलत बसायला वेळ नव्हता त्यामुळे जवळ जाणं भाग होतं.मी दबक्या पावलानी सरकलो..गुडघ्यावर बसलो एक क्लीक केला...सापाला ऐकू येत नाही असं ऐकलं होतं त्या मुळे जोवर तो पहात नाही तोवर भिती नाही मी पुन्हा क्लिक केलं.आता फक्त ३-४ पावलांचं अंतर. तो वळला की समोरुन एक क्लिक करायचं अन त्याच चपळाईनं सट्कायचं असं पक्कं ठरवून पार दोन्ही कोपरं जमीनीला टेकतील इथपत वाकलो फोकस करुन वाट पहात आणि तो वळला मी क्लिक केला अन काय होतंय हे कळायच्या आत तो कॅमे-यावर झेपावला..त्याच गतीने मी पलीकडे स्वत:ला फेकुन दिलं. सोबत असलेल्यांच्या तोंडून अस्फुट किंकाळ्या बाहेर पड्ल्या. काय होतंय कळण्या आधी तो शेजारच्या झाडीत अंतरधान पावला. मी उठलो .हादरलेल्या सोबत्यांनी प्रेमापोटी शीव्यांचा वर्षाव सुरु केला होता.पण माझं लक्ष केंद्रीत झालं होतं कॅमे-या कडे.कारण त्या प्रसंगावधानाच्या क्षणीही माझ्यातला फोटोग्राफर सजग होता की नाही काहीच आठवत नव्हतं.मी घाईने लास्ट क्लिक तपासला आणि ओरड्लोच ‘येस्स्स’...कारण तो क्षण टिपण्यात मी यशस्वी झालो होतो.थरार या गोष्टीचा होता की मी केवळ दोन फुटावरुन मृत्युला हुलकावणीच दिली नव्हती तर त्याचं रुप कॅमे-यात बंद ही केलं होतं.उत्साह ओसरल्यावर जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा आनंदाच्या जोडीनेच भितीची एक थंड लहर अंगभर पसरत गेली.

19 comments:

 1. कोणताही छंदाचे वेड ही एक साधनाच असते.त्यामध्ये काळ-वेळ-भय कशाचेही भान नसते. तेव्हाच असे अप्रतिम चित्रण केले जाते! आपल्या या चित्त-थरारक अनुभवातून आपली एकाग्रता व धाडस दिसून येते! अप्रतिम नाग राजाचे चित्र!

  ReplyDelete
 2. GURU SIR APRATIM PHOTO KADLA AAHE. TUMCHA PHOTOGRAPHI CH CHANDE WED LAVNARA AAHE.KEEP IT UP.( ME MANJUSHA, SIR TUMCHE SAGLE PHOTO KHUPCH CHAN ASTAT.)

  ReplyDelete
 3. दोन्ही फोटो छान आहेत. मात्र नशीबही थोर आहे तुमचं. इतकं धाडस करून फोटो काढलेत आणि आमच्यासाठी ब्लॉगवर टाकलेत त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. पुढच्या वेळेस मात्र जपून. सापाला ऐकू येत नसलं तरी त्याला कंपनं समजतात.

  ReplyDelete
 4. प्रचंड भारी आहे दुसरा फोटो!
  पण पुढच्या वेळी जपूनच! :)

  ReplyDelete
 5. perfect timing but so lucky jump to inside.

  ReplyDelete
 6. swath sathi jagato aahes... gr8..! faar thodyanna asa karayala milate...
  tuza anubhav wachtana janavla ki tu nemkya shabdat lihito aahes- to tuzya anubhavacha tharar neet pohochavlas amchyaparyant... ya nimittane 'kavi' guru madhala 'lekhak' guru hi sarvansamor prkat zalay... thanx to Nag-Raj....!
  ani ho, photo tar Apratimach...!!!

  ReplyDelete
 7. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 8. अप्रतिमच आहेत photo, पण पुढच्या वेळी जरा जपूनच बरं का?

  ReplyDelete
 9. photo khupach chhan ahet pan tych barobar swatahachi kalaji ghe re bala

  ReplyDelete
 10. mast photo ahet....
  Ani varnan pan...kalji ghya next time....

  ReplyDelete
 11. photo chhan ch alay.... pan parat kadhich ashi risk gheu naka

  ReplyDelete
 12. काय गंमत आहे पहा! फोटो शेअर करता येतो, पण त्याचा थरार अनुभववाच लागतो! तुझ्या बोटात आणि लेखणीत इतकं सामर्थ्य आहे की तू आम्हाला दोन्हीचा आनंद - अनुभव दिलास!

  ReplyDelete
 13. Vachunach Kalajacha thoka chukala .... Pan risk hoti ....

  ReplyDelete