Monday, September 27, 2010

कुठे शोधीशी रामेश्वर अन....



आठ मैल पायी चाललो मग सात तास रांगेत उभा राहून दर्शनाला पोचलो तर xx च्यानी दोन मिनिटात ढकलून दिलं.साधे हात जोडायचीही उसंत नाय रे दिली.माझा एक स्नेही मला सांगत होता.मी म्हटलं गरज काय होती तुला जायची?
परमेश्वर म्हणजे निर्गुण निराकार हे मान्य?
तो म्हणाला,‘मान्य..!’
मग तो ह्या भक्तीच्या सुपरमार्केटस मधे मिळेल का?
‘म्हणजे?’ तो बावरला,
मला सांग हल्लीची ही सो कॉल्ड देवस्थानं म्हणजे दुसरं काय असतं?मुठभर बड्व्यानी एखाद्या देवाला तावडीत पकडावं त्याला सोन्या मोत्यानं मढ्वावं आणि बाजारात बसवावं?मग त्याच्या नावाने जाहिरात बाजी करुन खच्चून पैसा ओढणारी आपली दुकानं थाटावीत?त्यांच्या श्रीमंतीचं हिडीस प्रदर्शन भरवावं.सो कॉल्ड भक्त गण ही मग बाजारात गेल्या प्रमाणे जाहिराती आणि लोकप्रियता पाहुन दुकान निवडणार आणि पाच नारळांच्या बदल्यात नोकरी किलोभर मोद्कांच्या बदल्यात छोकरी दहा तोळे सोन्याच्या बदल्यात एखादं घसघशीत कॉन्टॅक्ट असली निर्लज्ज डील्स त्या जगन्नीयंत्या कडे करणार..मग तिथे जमणा-या मलिद्याच्या मालकी हक्का वरुन अधिकारावरून या भक्तीच्या दलालात रंगणारं राजकारण . त्यात वाद करुन त्यात एकमेकांचे गळे चिरण्यापर्यंत जाणारी त्यांची लालसा.थोड्क्यात जिथे स्वार्थ,लोभ,मोह,द्वेश,इर्षा अशा अनेक भावनांचा महासंग्राम चाललाय अशा ठिकाणी तो सापडेल का?
खरंच रे.नाहीच सापडणार.पण मग कुठे सापडेल तो?
माझ्या मते निस्वार्थ सेवेतुन मिळणा-या आनंदाची परीसीमा म्हणजे परमेश्वर प्राप्ती.कुठल्याही स्वार्थी हेतू विना आपण केवळ माणुसकीच्या नात्याने आपण एखाद्याच्या गरजवंताच्या,पिडीताच्या मदतीला धावून जातो.प्रसंगी आपलं कसब पणाला लावतो.अशावेळी ते काम यशस्वी पणे तडीस नेल्या नंतर त्या व्यक्तीच्या कृतार्थ नजरेत तरळणा-या आनंदाश्रुत पहा.तुला परमेश्वराचं प्रतिबिंब दिसेल.तो दुसरा तिसरा कुणीच नसतो तुमचंच प्रतिबिंब असतं ते.पण काही क्षणांकरता त्याच्या करता तुम्ही परमेश्वर झालेले असता.
खरं तर देव दानव आणि मानव तिघंही अंशात्मक रुपाने आपल्यात असतातच.पण ज्या क्षणी तुम्ही अशी निस्वार्थ सेवकरता झटत असता तेव्हा तुमच्या नकळत हा परमेश्वराचा अंश मोठामोठा होत जातो..तुम्हाला तो दिसतो त्या कृतज्ञ डोळ्यात केवळ एकच क्षण त्या क्षणा करता झटावं. एकदा का त्या क्षणात होणा-या त्या जिवंत अनूभूतीची गोडी तुम्हाला कळली ना की कुठल्याही भक्तीच्या सुपरमार्केट मधे तासंतास ताटकळण्याची गरज उरणार नाही.

20 comments:

  1. खूप छान विचार आहे गुरु. खरं तर माणसाने माणसाशी माणसासारखे वागले तर नाही का त्याला देव सापडणार? आणि आपण तर म्हणतोच नाही का आपला देव सर्वत्र असतो. ह्याचाच अर्थ असा नाही का होत कि आपण जे वागतो, बोलतो त्या प्रत्येक गोष्टीकडे त्याचे लक्ष आहे? का मग आपण हे असे थोतांडाला बळी पडतो? का आपण त्यानेच निर्माण केलेल्या सृष्टीचा साधा आदर देखील करत नाही?

    ReplyDelete
  2. namaskar guru.ya vishayala wacha fodane aniwarya hote.bholyabhabadya jiwancha thet devashi duwa jodun denare preshit yala jababdar ahet ki dole asun andhapane ranget ubhe rahanare hatabal(?)yala jababdar ahet?sarvat vait he ki te pahanari kovali pidhi ghadavnare mahabhag tyat sarvat pudhe ahet......
    nandini.pune.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. १००% सहमत. एक स्त्री म्हणून आलेला अनुभव सांगते. एकदा कोणाला तरी नाही म्हणता न आल्यामुळे माझ्यावर एका अतिशय लोकप्रीय मंदिरात जायचा प्रसंग आला. प्रचंड गर्दी. अंधा-या, कोंदट देव्हा-यातील मिणमिणती एकुलती एक tube light वीज गेल्याने बंद पडली. मग जे सर्व प्रकारचे स्पर्ष झाले त्याने इतकी किळस आली की स्वच्छ पाण्याने आंघोळ करे पर्यंत अपवित्र, विटाळलेलं वाटत राहिलं. त्यात त्या बडव्याने केस धरून डोके धरून मुर्तीच्या पायावर आपटल्याने टेंगूळ आले ते वेगळेच.

    तेव्हापासून माझ्यासाठी ही भक्तीची super markets संपूर्णत: वर्ज्य आहेत. माझ्यासाठी देव म्हणजे स्वच्छ सुंदर मोकळं मन...
    जेथे शक्य असेल तेथे केलेली मदत... पण ’मदत’ करण्याचा आविर्भाव नको.. तसेच गरजू म्हणजे केवळ दीन, पतीतच असण्याची गरज नाही... असे बरंच काही...

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेख आणि वासुदेव कामतांचे पेंटींगही छानच..

    ReplyDelete
  6. गुरु...
    इतक बोलून / लिहूनही लोकांची श्रद्धा (खर तर अंध:शरद्ध) कमी कुठे होते आहे?
    मी तर हल्ली सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव, बिराख्यातल्या मंडपात बघायला शिकलो आहे.
    जर्मन बेकरी स्फोटा नंतर, पुणे पोलिसांनी, गणपतीचे मंडप झाकायला बंदी घातली..
    मग हि अक्कल, मुंबई पोलिसांना येत नाही? इथे हा नियम / कायदा करता येत नाही?
    का त्यासाठी इटालियन गांधींची मर्जी लागते?

    ReplyDelete
  7. Far sunder ani manala patanara lekh ahe. Pan kalata pan valat nahi ashi parichiti ahe.Phaktta mansani mansa sarkhe vagle tari khup zale.Pan Guru kharach khup chan vichar ahe.

    ReplyDelete
  8. नक्कीच या सुपर मार्केटमध्ये जाऊन देव पावणार नाही. या बडव्यांनी त्याला आता कोठीवर आणून बसवलाय. पंढरपूर काय किंवा लालबाग काय तिथला देव केव्हाच पळालाय.

    ReplyDelete
  9. गुरु,
    गंगाधर गाडगीळांचे न्यायमूर्ती रानडे ह्यांच्या आयुष्यावरील 'मन्वंतर' हे पुस्तक वाचताना खालील माहिती मिळाली...
    रानडे देवभक्तीवर म्हणतात," देवाची पूजा नाही तर उपासना करावी. पण त्याच्यावर फुले वाहून ती करायची नाही, तर त्याचं गुणगान करून करायची. चांगली कृत्ये करून, गोरगरिबांची सेवा करून, कुणी अडला, अपंग असला तर त्याच्या मदतीला धावून त्याची सेवा करावी. सर्व माणसं ही परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणजे सगळी माणसं म्हणजे एक कुटुंबच आहे, असं आपण मानायचं असतं आणि मला अमकं मिळावं, तमकं मिळावं, मला परीक्षेत पास कर, माझं दुखणं बरं कर, असं काही देवाकडे मागायचं नसतं. देवाचं गुणगान आत्मिक उन्नतीसाठी करायचं असतं."

    ReplyDelete
  10. कधी कधी मनात विचार येतो की प्रसिद्ध व्यक्ती त्या देवळात जातात म्हणून लोकांना तिथे जायचं असतं का? कारण जाहिराती तशाच केल्या जातात. अमूक अमूक दर मंगळवारी इथे येतात वगैरे.

    तुमचा लेख वाचून मला माझ्याच तुझे आहे तुजपाशी या लेखाची आठवण झाली. इथे त्याची लिंक दिली आहे.

    ReplyDelete
  11. agdi patla! ,majhe ase vichar kunala sangitale ki loka majhyakade kay murkha aahe ya arthane baghtat. Pan devavar shraddha asel tar nuste naam smaran kelyane pan shantata milte. jar dev saglikade aahe tar devlat 2/3 taas rang laun ghai ghai madhe devakade baghun, darshan nave, nuste baghun samadhan manayache, yala kay artha? deva samor crores ne paisa jama hoto tya paishani aganit bhukelya lokana kititari diwas anna milel, kapde miltil, pan he kase kunala kalat nahi? - leena kulkarni

    ReplyDelete
  12. chhan vatala vachun ani patala pan ekdam---kharach yevadhe lamb jayachi garaj nahi--dev mansat shodhanya sarakhe sukh nahi

    ReplyDelete
  13. guru hya anushanghane ek exp. share karavasa vatato.... me majya sudaivane Girgavachya chalit lahanchi mothi zale, tevha maze vadil phirayla mhnun siddhivinaykala gheun yayache, Amhla prabhadevi tas mahit hot, tumhi mhnata tas, Ganpati bappa baddl chi apulki nirman zali, baba nuste mhnale naa ki chala aaj phirayla jau yaa, me apl ekch baba prabhadevi, tevhach mandir ajun hi athvat, ek mottha vadach zad, tyala lagunch ganpatich chhotekhani mandir, no gardi, no gondhal,dagdtlya devach devpan anubhavta yaych,kahi hi n magta bolta barch kahi dyaycha to.......pan aaj rojchya roj prabhadevila yetey, geli 10 varsh pan kahrch ata tya mandirat javas vatat nahi, vatat apla tr dev hya gardimule kadhich dadar chaupati kiva sea facela palun tar gela nasel......

    ReplyDelete
  14. गुरू गंमत म्हणजे मी सुद्धा हेच टायटल घेऊन ४ वर्षापूर्वी मी याच विषयावर एक ब्लॉग लिहिला आहे. तुम्हाला तो नक्कीच आवडेल! एकदा नक्की वाचा :) http://yogi3.blogspot.com/

    ReplyDelete
  15. अगदी योग्य लिहिलय. श्रद्धेचा व्यापार चालू आहे. रात्री एखाद्या ठिकाणी शेंदुर फासलेला वाटोला दगड ठेवायचा आणि सकाळी उठून बोंब मारायची देव प्रगट झाला. मग व्यवस्थित मार्केटिंग करून आधी मंदिर आणि मग ५ वर्षात देवस्थान... बडवे बनून मग सात पिढ्याच्या ऐशोआरामाची सोय...

    या संस्था कडून काही सामाजिक कार्य झालेली माझ्या तरी ऐकिवात नाहीत

    ReplyDelete
  16. खरंय अगदी..... ह्या विषयावर लिहिणे गरजेचंच होतं/आहे....

    ReplyDelete
  17. Bohot Khoob...
    Bhohot hi khoobsoorat khayaal hai, Guruji.
    Kal raat hi aapki film Natarang dekhne ka ittefaaq naseeb huaa. Main marathi padh bhi leti hoon aur samajh bhi leti hoon lekin bolne mein, yaani use apni abhivyakti ki bhasha banaane mein zaraa jhijhak si hai, isliye hindustani mein izhaar-e-khayaal kar rahi hoon. Yaqeen maaniye....kal raat se ab tak na maloom kitni baar, Natarang ke tamaam gaane main sun chuki hoon.Aaj mere liye chandigarh(punjab/haryana) mein maharashtra jee uthaa...uske liye aapka tah-e-dil se shukriya.
    Khoop Abhaar.
    Parul

    ReplyDelete
  18. भक्तीची सुपर मार्केट्स लय भारी राव हे लिहिण्याच्या आपल्या हिम्मती ला सलाम.
    और इसी श्रद्धा का दुरुपयोग करके मौत के बाद का स्वर्ग नरक का झूठा जाल फैलाकर जनता को लुटा जा रहा है. जंहा आदमी के खाने के लिये एक वक्त की रोटी नसीब नही वंही पत्थर की मूर्ति को छपन भोग लगाये जाते है यह विडम्बना है. आप भ्रष्ट्राचार, पाप , काला बाजार , बेईमानी करके हजारो करोडो रुपये कमावो और इस काले कमाई का १०% से २५% हिस्सा भगवान इष्ट देवता को चढ़ावा दो आप पाप मुक्त हो जाते है. फिर नया भ्रष्ट्राचार करने के लिये आपको अधिकार मिल जाता है.
    http://thanthanpal.blogspot.com/2011/07/blog-post_09.html

    ReplyDelete
  19. khup chan vichar aahet tumache.....ekdam apratim shabadat tumhi he mandale ahe...mazya hi manat asech vichar hote pan aata tumhi tya vicharana dhar dili aahe....khup ch sundar....:-)

    ReplyDelete
  20. khup chan vichar aahet tumache.....ekdam apratim shabadat tumhi he mandale ahe...mazya hi manat asech vichar hote pan aata tumhi tya vicharana dhar dili aahe....khup ch sundar....:-)

    ReplyDelete