Monday, July 26, 2010

रेडीओ.. मनाचा हळवा कप्पा...


अस म्हणतात ट्रेंडनुसार गाणी बदलतात संगीत बदलतं..पण अशी मोजकीच गाणी आहेत जी अनंत काळ टिकून आहेत.अर्थात जे उत्तम असतं ते ट्रेंड्च्या अनेक लाटा पचवूनही टिकतच.ब-याच जुन्या गाण्यांच्या बाबतीत हे पहायला मिळतं पण म्हणून.नवीन ते वाईट असा अर्थ होत नाही प्रत्येक दशकात बरी वाईट गाणी येत रहातात.त्यातली उत्तम ती रसिकांच्या मनात खोल रुतुन बसतात आणि दिर्घायू होतात बाकीची प्रवाहासोबत वाहून जातात. पण पुन्हा मी असंही म्हणेन की विस्मृतीत गेलेली सारी गाणी वाईट असतात असं नाही काही उत्तम गाणी केवळ रसिकांपर्यंत पोहोचलीच नाहीत म्हणून विसरली जातात याला कारण माध्यमं आहेत.
माझ्या लहान पणी घराघरात रेडीओला मानाचं स्थान होतं.त्यावरुन सतत मराठी गाणी वाजत इतकी की ती कानातून जाऊन मनात खोलवर झिरपून आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जात.लहान पणी जे मनात घर करतं ते अनंत काळ आपल्या मनात रहातं कारण ते केवळ गाणं नसतं तर आपल्या बालपणाचा एक भाग असतं.म्हणून आजही माझं गाणं खूप आवडलं असं एखाद्या लहान मुलाच्या वा त्याच्या पालकांच्या तोंडुन ऐकतो तेव्हा निश्चिंत होतो की आपल्या गाण्याला पुढ्ची ५०-६० वर्षे मरण नाही .खरं सांगायचं तर रेडीओ कोप-यात गेला आणि मनाचा तो रसिक कोपरा सुना झाला. रेडीओची जागा टिव्हीने घेतली पण टिव्ही वरची गाणी श्रवणीय होण्यापेक्षा प्रेक्षणीय होत गेली डोळे सुखावले पण कान आणि मन मात्र त्या जुन्या आठवणीत गुरफटुन राहिले...
भावसंगीत तर पोहोचेचना अस्सल रसिकांपर्यंत. उत्तम काम करणारी संगीतकार गीतकार गायकांची नवी पिढी पोहोचायची कशी ?
त्यात सिनेमांच्या मल्टी रिलीज मुळे २५- ५० आठ्वड्यांचा धदा ८-१० आठवड्यात करुन सिनेमे बस्तान हलवतायत त्यातली गाणी मनात रुजतायत म्हणेस्तोवर त्याच कुंडीत नवी रोपं लागतायत ..नवी गाणी नवं संगीत आठवड्याला ४ सिनेमे जवळपास २० गाणी पण ती रुजायला फोफावायला वेळ नको? त्यातही काही पिंपळासारखी जिद्दीने तग धरतात पण बाकीच्यांचं काय..म्हणून गरज आहे रेडीओ ची...FM वरुन मराठी गाणी वाजावी ही रसिकांसाठी आसुसलेल्या कलावंताची आस आहे तशीच उत्तम संगीतासाठी व्याकुळलेल्या रसिकांचीही हाक आहे.
त्यातल्या त्यात रिआलिटी शोज नामक प्रकाराने थोडा दिलासा दिलाय.त्यातुन गायक घडतात का? त्यांना व्यासपीठ तरी मिळतं की! असे अनेक वाद प्रतिवाद असले तरी त्यातुन लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रसिकांना मराठी गाणी संगीत ऐकू येउ लागलं नव्या पिढीत आपल्या मराठी गाण्यातही गंमत आहे याची जाण आली.ब-याच नव्या संगीतकार, गीतकार,गायक यांच्या मेहनतीला दाद मिळाली.ते त्यांच्या रसिक मायबापा पर्यंत पोचले पोहोचले हे ही नसे थोड्के.पण हे बीज जर फोफावायला हवे असेल तर रेडिओला पर्याय नाही.FM वाहिन्यांवर नुकताच झालला झालेला चंचूप्रवेश पुढे जाउन तिथल्या सो कॉल्ड पॉलीस्यांच्या अभेद्य भितींना खिंडार पाडेल ही आशा ही हळवं करणारी आहे.

19 comments:

 1. रिअ‍ॅलिटी शो च्या निमित्ताने जुन्या गाण्यांचा आनंद घेता येतो हे मात्र खरंच! तरीही जुनी मूळ गाणी एफ. एम. वर ऐकताना जे वाटेल ते विलक्षण असेल.

  ReplyDelete
 2. एफेम वर मराठी गाणी ऐकू येऊ लागली कि नवीन गाणी कानावर पडायला मदत नक्कीच होईल. परंतु नवीन गाणी अमर होतील कि नाही हे कदाचित काळच ठरवू शकेल. आणि तीच तर नवीन गाण्यांची परीक्षा असेल. कसें? :)

  ReplyDelete
 3. मराठी संगीतानी मध्ये एक डुलकी घेतली होती. आता आपल्यासारख्या गुणी मंडळींमुळे पुन्हा नव्याने मराठी संगीतही कात टाकत आहे. माझ्या काही भावना मी माझ्या "मराठी संगीत आणि FM रेडिओ"(http://marathi.puneripundit.com/2010/07/marathi-songs-and-fm-radio/) येथे व्यक्त केल्या आहेत. जेंव्हा अनेक लोक एकाच विचार व्यक्त करतात तेंव्हा त्यावर कृती होणार ही श्रींची इच्छा हे नक्की. मराठी संगीताला परत वैभव प्राप्त होईल आणि ते भारतीय संगीताला नवी दिशा देईल याची मला खात्री आहे.

  ReplyDelete
 4. गुरू, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहेस. रेडियो हे नवीन गाणी श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय प्रभावी माध्यम आहे. यावर सकाळमध्ये आलेला हा लेख.
  http://72.78.249.107/Sakal/21Jul2010/Normal/Mumbai/MumbaiToday/index.htm

  ReplyDelete
 5. खूप छान ! तुमच्यासारख्या सच्च्या कविचे हे विचार सर्वानीच , विशेषतः रेडिओ क्षेत्रातील लोकांनी लक्षात घेतले पाहिजेत. खरोखरच आजही मराठी संगीत आणि संस्कृतिच्या बहरासाठी रेडिओला पर्याय नाही. तुमच्यासारख्या कलावंतांचे प्रयत्न सफल होवोत आणि लवकरच अशी संपूर्ण मराठी एफएम वाहिनी आम्हा रसिकाना ऐकायला मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना..... तथास्तु!!!

  ReplyDelete
 6. अप्रतिम गुरू.... कौशल दादाने मांडलेला हा मुद्दा खरचं तुझ्या या लेखातून प्रकाशात आला आहे... मराठी संगीत अजरामर आहेच पण या निमित्ताने सर्वच संगीतप्रेमींना नवे चैतन्य व नव्या आशा,दिशा मिळेल यात शंकाच नाही....
  असाच लिहिता रहा.....

  ReplyDelete
 7. आपण जेव्हा गाणे ऐकत असतो तेव्हा ते कानातून मनात उतरवत असतो सगळीच गाणी मनात घर करत नाहीत पण काही गाणी मात्र मनात अशी काही रुजतात कि कायमचे घर करुन जातात...मला असं वाटतं जेव्हा आपल्याला त्या गाण्यातील आत्मीयता ल॔‍‌क्षात येते तेव्हा ते गाणे आपोआपच रुजते....यासाठी गाण्यातील भावना ,त्याचा अर्थ जाणून घेणे महत्वाचा असतो...एखादे गाणे बनवताना लागलेले कष्ट,संगीतकारांची मेहनत जेव्हा रसिंकापर्यंत पोहचते तेव्हा ते गाणे अधिकच खुलते...म्हणून गाण्यासोबत गायक,संगीतकार आणि गाण्यासंबंधी व्यक्तीं बद्दल रेडिओ वर ऐकायला आम्हास आवडेल....आणि ते रुजेल अशी खात्री वाटते....आपला लेख खरच खूप काही सांगून जातो...

  ReplyDelete
 8. खरचं इथे प्रत्येकाच्या मनात हा विचार कधी तरी नक्कीच आला असणार.
  गुरूने तो सुंदर आणि तितक्याच सहज शब्दात मांडला आहे .
  आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कि जास्तीत जास्त मराठी गाण्यांची मागणी करणे..
  मागणी तसा पुरवठा... :).

  ReplyDelete
 9. khup sundar lihilayas. manat aaste pan te kagdawar utravta yet nahi. te tuza lekh wachlyawar samor ubhe rahata.

  ReplyDelete
 10. पटलं तुमचं म्हणणं गुरु जी, आता सुरुवात झालीच आहे, तर आपण थोडातरी हातभार लाऊया या भावनेने FM ऐकायला सुरुवात व्हावी अशी इच्छा आहे.... रेडिओची जागा आता इतर माध्यमांनी घेतलीये हे खरं असलं, तरी आता वेगळी पूर्वी कधी न ऐकलेली मस्त मराठी गाणी ऐकायला मिळवीत हीच इच्छा.....

  ReplyDelete
 11. दिवसभर मराठी गाण्यांचे विविध प्रकार ऐकवणार्या मराठी एफ.एम. चॅनेल चे बीजारोपण करा. विस्म्ृतित गेलेली परंतु सुंदर गाणी पुन:प्रत्यायाचा आनंद देतील यात शंका नाही. तू हाताळ्त असलेल्या विविध गीत प्रकारांबद्दल हार्दिक अभिनंदन.

  ReplyDelete
 12. नक्कीच, पण रेडिओवर मराठी गाणी ऐकताना त्यांना ती ’हाणून मारून’ वाजवायला लावली आहेत असे वाटते, त्यासाठी मराठी चित्रपटांची, गाण्याच्या पाश्वभूमीची, संबंधित कलावंतांची परीपूर्ण जाण असणाऱ्या RJ ची गरज आहे, कारण आज लोकांना ’वाजले की बारा’ माहित आहे पण बेला व गुरु माहित नाही.(हे माझं वयक्तिक निरिक्षण आहे)
  To मनाला साटम, मी तर मराठी गाण्यांमुळे रेडिओ ऐकायला सुरवात केली, अभ्यासिकेत बसून मी रेडिओ ऐकतो.

  ReplyDelete
 13. नवीन व जूनी मराठी गाणी जनमानसात रुजवायची असेल तर रेडिओ ह्या मध्यमा शिवाय पर्याय नाही.पण गाण्याचे संगीत,शब्द उत्तम असेल तरच ती गाणी कायम टिकून रहातील.नाही तर रडिओ वरुन गाणी कितीही ’ह्यामरिग’ केली तरी काळाच्या ओघात ती मागेच पडतील हे मात्र नक्की...

  ReplyDelete
 14. खूप छान ! हे विचार सर्वानीच , विशेषतः रेडिओ क्षेत्रातील लोकांनी लक्षात घेतले पाहिजेत.हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहेस

  ReplyDelete
 15. FM वर मराठी गाणी लावलीच पाहिजेत. संगीतकार कौशल इनामदार यांनी यासाठी एक चळवळच उभी केली आहे. 'मराठी अभिमान गीत'च्या माध्यमातून त्यांनी एक सकारात्मक पाऊल टाकलं आहे.

  ReplyDelete
 16. FM वाहिनीन वर मराठी गाणी लावलीच पाहिजेत
  मराठी किती तरी सुरेख गाणी आहेत कित्येक थोर गायक होऊन गेले उदाहरण घ्याचं झालं तर पंडित भीमसेन जोशी,वसंतराव देशपांडे,बालगंधर्व, कुमारगंधर्व ,रामदास कामट[मुंबईचा जावईतला प्रथम तुझा पाहता(अप्रतिम गाणं)] ह्याची जादू काही औरच.ह्या अमृत कुंभाच आस्वाद नव्या पिढीलाही लाभाव त्यासाठी FM वाहिनीन वर मराठी गाणी लावलीच पाहिजेत

  ReplyDelete
 17. namaskar gurubhaiyya!
  dhadasane mhanen ki jyala aayushyatle kalta tyachach haat redio kade valato.alikade fm.war baryachda marathi gani lawatat.marathmoli sakal vyatirikt anekda junya navya selected ganyancha meva shrutinna chakhayla milto,recorded gani apan laun aikna an rediowar achanakpane ekhadya ganyane aksmat hajeri lawna yatla farak "dardich"samju shakto nahika?
  Nandini.pune.

  ReplyDelete