Thursday, June 10, 2010

अप्सरा आली..


नटरंग चित्रपटातल अप्सरा आली प्रचंड लोकप्रिय झालं.. त्या नंतर मला अनेकानी अनेकवेळा विचारलं अप्सरा आली हे एका सौदर्यवतीचे वर्णन असले तरी लिहीताना तुमच्या नजरे समोर नेमकं कोण होतं? खरं सांगायचं तर स्वत: लावणीच. नटरंगच्या निमित्ताने लावणी या साहित्य प्रकाराचा सखोल अभ्यास करताना तीनं मला इतकी भुरळ घातली की मला ती जणू एखाद्या अप्सरे सारखी वाटू लागली.. एखाद्या शाहिराच्या नजरेने तीच्या कडे पहाताना जाणवले की.. लावण्यवती लावणी ही साहित्यप्रकारातली अप्सराच आहे जणू.

कोमल काया की मोहमाया? खरंच तीने भल्याभल्याना भुरळ घातली. रंगेल रसिकांची बात सोडा अगदी शब्दप्रभू पंडीत विद्वान अगदी संत कवींनाही. तिची अदा,तिची नजाकत, तिच्या सौदर्यांच्या छटा पाहिल्या अन जाणवलं की ही नुसतीच लावण्यवती नाही तर शृंगार रसात नटुन थटुन जणू ती एखाद्या अप्सरे सारखी पृथ्वीतलावर उमटली आहे.आणि कस्तुरी सारखी मनमनात दरवळते आहे . नेमक्या याच विचारातून हे काव्य कागदा वर उतरलं. लावणी असली तरी एखाद्या आध्यात्मिक काव्या प्रमाणे भारुडा प्रमाणे तिच्यात एकाच वेळी हे दोन अर्थ रुपकात्मक रित्या मांड्ता आले.म्हणून हे काव्य मला वेगळं समाधान ही देउन गेलं. थोडक्यात काय तर यातलीअप्सरा" म्हणजे स्वतः लावणीच.!!!!

12 comments:

  1. kya baat hai!! pan kharach prashna paDlela ki nakki koN asel hi "Apsara".

    ReplyDelete
  2. उत्तर छान आहे.
    पटणारं देखील आहे..
    पण तरीही वाटतंय, कि हुशारीने मूळ विषयाला बगल देण्यात आली आहे कि काय?!
    :)

    ReplyDelete
  3. हि अप्सरा सर्व जणांना भाळवून गेली... आता हि अप्सरा आमच्या समोर लावणी मधील लावण्यवती च्या रूपानेच प्रदर्शित होते,,, कारण हे चित्र रुपात आमच्या समोर आल आहे.. पण गुरु जी तुम्ही त्या चित्रपटा अगोदर, हे वर्णन डोळ्यासमोर ठेवून कसा काय निर्माण केलात ह्याच पुरेपूर मनापासून कौतुक

    - तुषार पंगेरकर

    ReplyDelete
  4. फार छान मित्रा ..
    अप्सरा आली ही लावणी अप्रतिम आहे | आशा आहे ... भविष्यात याच प्रकारचे अप्रतिम गीत आणि लोक गीत आयिकन्यात येतिले | अभिनन्दन |
    शांतनु पाध्ये , इंदौर

    ReplyDelete
  5. Hummm Vichar Kharach Gr8 aahe hya lavni magacha pan nakkiiii ajun ekda vichar karun paha, Kunich nahi...... najresamor aali.

    ReplyDelete
  6. Excellent! Tumhala shobhateel asech tumche vichar aahet kharokhar. Ashi genuinity manala bhural ghalate.
    Keep going! Tumche likhan ani Ajay-Atul che music Marathi cinema la suvarnakaal ananaar he nakki!

    ReplyDelete
  7. Khup chhan...."lavani" che soundarya itke sahaj khulavun dakhavlay tumhi.....gr8 ahat ! itke divas fakta tumchya shabdanche "fan" hoto, ata "vicharanche" pan zalo !

    ReplyDelete
  8. लावणीलाच अप्सरा कल्पून केलेलं काव्य मला आवडलं. इथे मला एका गोष्टीची आठवण झाली की, सुफी काव्यात जसं इश्वरालाच प्रियकर कल्पून काव्य केलं जातं आणि म्हणूनच ते अस्सल होतं, तसंच इथेही झालं आहे.

    ReplyDelete
  9. Namskar Guru.kharokhar apan mhanalat ki hi lavnich mazi apsara ahe,karan lihitana tumhi tumchya lekhanishi ekarup zalat aani tya samadhitun tumhala ticha sakshatkar zala.tussi great ho Guru..asla kahi zepuch shakat nahi rav amhala..far varcha ahe he mhanaje.keep it up.tc.
    Dev nandini. Pune.

    ReplyDelete
  10. नमस्कार... तुम्हाला येथे पाहून खूप आनंद झाला...अतिशय सुंदर गाणी आहेत नटरंग मधली... लावणी हा नृत्य/काव्यप्रकार पुन्हा काही काल मुख्य प्रवाहात दाखल झाला या चित्रपटाने. शब्दकळा अतिशय चित्रमय आणि नादमय दोन्ही. खास आवडले... खर सांगायचे झाले तर त्या गाण्यांच्या रूपाने शाहीर राम जोशीच पुन्हा अवतरले असा भास झाला... जबरदस्त. तुमच्याकडून पुढे बऱ्याच अपेक्षा आहेत आता....

    ReplyDelete