Sunday, May 30, 2010

"गुरु"


जे जे जातीचा जो व्यापारु l ते ते त्याचे तितुके गुरु l याचा पाहता विचारु l ऊदंड आहे l असे समर्थानी सांगितले आहे, पण आयुष्यात अनुभवासारखा गुरु नाही असं मला वाटतं.. कुठ्लाही गुरु म्हणा शिक्षक म्हणा थिअरी आधी मग प्रॅक्टिकल अस मार्ग स्विकारतो. पण अनुभव हा एकमेव गुरु असा आहे जो आधी प्रॅक्टिकल देतो.त्यामुळे थिअरी तुम्हाला घोकावीच लागत नाही ती मेंदुवर कायमची कोरलीच जाते. माझ्या करता तर अनेक निर्जीव वस्तुंनीही अशा ‘गुरु’ चं काम केलंय.
कॉलेजात असताना मित्रांसोबत पिकनिकला गेलो होतो. शहरापासुन दूर त्या अभयारण्यात जेवण झाल्यावर गवतावरच मस्त लोळत पडलो असताना शेजारी गारवा-यावर घोरणा-या.मित्राच्या SLR कॅमे-याला डोळा लावायचा मोह झाला. आजुबाजुला नुस्ताच पाचोळा कसला फोटो काढावा मग मी पडल्यापड्ल्याच पलिकडच्या रिकाम्या डबड्यावर तो फोकस करु लागलो आणि अचानक थांबलो चकित झालो अतिशय मोहक असं गवताचं फुल मला पट्लावर दिसत होतं गवताच्या सुक्ष्म फुलात इतक सौंदर्य सामावलंय याचा साक्षत्कार मला प्रथमच होत होता.
मी कॅमेरा बाजुला केला समोर पाहिलं नुसत्या डोळ्याना फक्त गवत दिसलं मी पुन्हा कॅमे-याला डोळा लावला मागचं फुटकं घाण डबडं दिसत होतं. मला ते पहावेना. मी झटकन फोकस शिफ्ट केला फुल स्पष्ट होत गेलं त्या फुलावर फोकस केला डबडं तिथेच होतं पण माझ्या फोकसींग मुळे माझ्या पुरतं त्याचं अस्तित्व धूसर होत नाहीस झालं होतं. हा छोटासा प्रसंग माझ्याकरता खूप शिकवणारा ठरला. एक म्हणजे आनंदाचं मुळ तुमच्या आसपासच असतं पण भोवतालच्या अनेक हव्या नकोशा गरजांच्या गर्दीत ते शोधावं लागतं,अणि दुसरं म्हणजे अनेकदा तुम्हाला आयुष्यात जे हवंय,जे साध्य करायचंय त्याच्या अन तुमच्या दरम्यान जेव्हा ब-याच नकोशा त्रासदायक गोष्टी येतात तेव्हा त्या टाळण्याकरता त्रागा करण्याऐवजी तुमच्या ध्येयावर जास्त फोकस केलंत तर नको असलेल्या त्या गोष्टींचं अस्तित्व तुमच्या करता धुसर होऊन जातं. माझ्या अगणीत गुरुंच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली, ‘ कॅमेरा ’....

8 comments:

  1. namskar Guru.apan agdi achuk bolalat.lahanpani bodhkatha wachaycho tyachi athwan zali.kahivela he aplya kas laxat ala nahi as watata.tumchya cameryatun ek navin view sapdla evdha khara..dhanyawad.
    Dev nandini. Pune.

    ReplyDelete
  2. अप्रतिम..........

    ReplyDelete
  3. he matra agdi patle mla...
    najrechya cameryatun je je swach sunder aahe tech baghave...nakoshya goshtinkade durlaksh karnech yogya aahe..

    ReplyDelete
  4. khoop mottha saangun gelaas mitra..ya var var chhotya vaatnarya ghatnetun!!sahee

    ReplyDelete