Sunday, May 23, 2010

शपथ तुला आहे..

परवा कुठेशी वाचलं या जगात सर्व माणसांना काही काळ फसवणं शक्य आहे तर काही माणसाना सर्व काळ फसवणं शक्य आहे.पण सर्व माणसांना सर्व काळ फसवणं कदापी शक्य नाही.अर्था्त या म्हणीचा उगम परदेशात झाला असावा किंवा स्वातंत्र पूर्व कालात तरी.तुम्ही म्ह्णाल कशावरुन हा अंदाज ? तर ज्या देशात गेली कित्येक वर्षे निवडणूक नावाचा सर्वसामान्यांच्या जाहीर फसवणूकीचा साग्रसंगीत सोहळा अतिशय दणक्यात पार पड्तोय त्या देशातला नागरीक भांगेच्या तारेत तरी असलं काही विधान करणं शक्य आहे काय? तेच नेते,तीच तशीच आश्वासनं, तेच छातीठोक दावे, तीच चिखलफेक,तोच खुळा आशवाद आणि पुन्हा तीच फसगत...असं कसं होत? अंधश्रद्धेपेक्षाही भयानक गोष्ट आहे ही. कोण करणार याचं निर्मूलन ? कसा होणार यात बदल? की दर निवडणूकी नंतर फसगत झालेला मतदार पश्चात्तापदग्ध होत हेच गाणे गात रहाणार?
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
प्रचारसभेतिल भाषणांची शपथ तुला आहे
स्वर इतका भावुक होता
पसरलेस हात
बळेबळे वाकून लेको
काढलेस दात
ओशाळ्या त्या हसण्याची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
निश्चित मी निवडुन येता
होइन तुझा दास
म्हणता तू इतुके माझा
गहिवरला श्वास
त्या फसव्या शब्दफुलांची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
निवडुनी परी येता मज तू
बनवलेस “मामा”
गच्च तव तिजोरी,माझा
खिसाही रिकामा
त्या पुढल्या मतदानाची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे

8 comments:

  1. ब्लॉग पोस्ट आणि कविता दोन्ही विचार करायला लावणारं आहे आणि म्हणूनच वाचल्यावर माझ्या मनात बरेच विचार आले पण ते सगळेच इथे लिहित नाही. भारतात अनेक वर्षं मतदार / सामान्य माणूस यांची राजकारणी लोकांकडून (त्यांना 'नेता' म्हणणे बरोबर नाही) फसवणूक होतेय हे खरं आहे. पण टाळी नेहमी दोन हातांनी वाजते आणि या बाबतीतही तसंच आहे असं मला वाटतं. राजकारणी लोक फसवतात पण आपण सुद्धा फसवून घेतो. कारण भारतीय लोकांना लोकशाहीमधलं 'of the people, for the people' हे हवंसं वाटतं पण 'by the people' ची जबाबदारी मात्र नको असते. पाच वर्षातून एकदा मत दिलं की आपली लोकशाहीतील जबाबदारी संपली आणि पुढची पाच वर्षं राजकारण्यांना शिव्या घालायला आपण मोकळे अशी आपणच आपली सोयीस्कर समजूत करून घेतली आहे. माझ्या मते एकतर भारतीय लोक लोकशाही "विचारसरणी"चे तरी नाहीत आणि म्हणूनच हजारो वर्षं आपल्याकडे, जगभरातल्या वेगवेगळ्या लोकांची, पण होती ती राजेशाही. किंवा तर मग हजारो वर्षं "प्रजा" म्हणून जगल्यावर "प्रजासत्ताक" म्हणून जगणं शिकायला ६३ वर्षांपेक्षा जास्त काळ लागणार असेल कदाचित :)

    ReplyDelete
  2. sunder.............
    Matadaranni jagrut vhava ......

    ReplyDelete
  3. tuz nav guru kiti barobar ahe..boss ahes! kas suchat re he sagal tumha lokana..amhi pan tyach jatyat bharadale jato..ani tumhi pan..pan tumhi tyachi chanashi poli karun dusaryana garam garam deta.grt.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. punha ekada sashtang namskar.............
    mala pan ata barik wichar karun as kai tari roj lihaw watatay....... prayatn karen.....
    Dokyawar hat asu de amachya
    pooja(chimani)

    ReplyDelete
  6. बऱ्याचदा आपण आपली जबाबदारी विसरून जातो.
    हे नक्की की आता कोणीच विश्वास ठेवण्याचा लायकीचा राहिलेला नाही.
    पण आपणच तर ही पैसे देऊन कामं करून घायची सवय स्वतःला आणि समोरच्याला लावून ठेवलेली आहे.
    करावे तसे भरावे..

    ReplyDelete
  7. ya visayawar bolale tar 'hama bolega to bologe ke bolti hai'asa ahe. evdhi vyavasthechi chid yenari paristhiti ahe.
    nandini. pune.

    ReplyDelete