Saturday, May 1, 2010

तो रांगडा आहे कणखर आहे अंगभर धगधगत्या इतिहासाच्या त्यागाच्या खुणा मिरवणा-या प्रतापी योद्ध्या सारखा त्याच वेळी हळवा सोशिक कनवाळू ही आहे..तो कधी भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे काठी हाणू माथा म्हणत प्रखर स्वाभिमानी बाप होतो त्याच वेळी विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले म्ह्णणारा कुटंबवत्सल माऊली होतो..गेल्या पन्नास वर्षातली वाढ्ता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा या वेगाने झालेली त्याची प्रगती तमाम विश्वाच्या डोळ्यात भरणारी.त्याच्या या कर्तबगारीला मानाचा मुजरा. तो...माझा महाराष्ट्र!!!

पण पन्नाशी नंतर काही पथ्य प्रकर्षानं पाळावी लागतात तशी ती त्याने पाळावीत.आपुलकीच्या नात्यानी ईतरांची ओझी खांद्यावर घेताना आपला कणा वाकणार तर नाही ना? याची काळजी घ्यावी ,परक्याच्या पोरांसाठी तेलकट तळताना आपलं का॓लेस्ट्रा॓ल वाढुन धमन्या चोंदणार नाहित ना याचा अदमास घ्यावा.किरकोळ जख्मा चिघळुन एखादा अवयव वेगळा करायची वेळ येण्याआधीच त्याची योग्य ती सुश्रुषा काळजी घ्यावी.रक्तात वाढ्णा-या फोफावणा-या भ्रष्टाचाराच्या साखरेवर तातडीची उपाय योजना करावी...खांद्यावर कानामागे बांडगुळासारख्या दिसणा-या गाठी निरुपद्रवी वाटल्या तरी वेळीच छाटाव्यात त्या कधी कर्करोगात बदलतील नेम नाही थोडक्यात जरा कठोर होऊन स्वत:कडे पहावं...कारण उद्या काही बिनसल्यास आम्हाला त्याच्या शिवाय कुणाचाच आधार नाही अन आम्हाला तो हवाय असाच अखंड अभेद्य...तो लेकराची ईतकी कळकळीची विनंती मनावर घेईल ही आशा.

8 comments:

  1. gr8 sakalich vachle ma.ta. madhe

    ReplyDelete
  2. लेख अप्रतिम आहे

    अगदी मनापासून धन्यवाद .....

    महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  3. Wellsaid Guru,
    मला आशा आहे की, हा उपदेश "तो" खरोखर ऐकेल.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. महाराष्ट्राचा हा स्वभाव आहे कि तुम्हि जितका विरोध कराल जितके दडपाल तितका तो उसळतो. "केला जरी पोत बळेची खाले। ज्वाळा तरी ती वरती उफाळे॥" हिच महाराष्ट्राची आंगिक प्रवृत्ती आहे. दुर्दैवाने काहि अंशी सर्व ठिकाणी दिसतो तसा टोकाचा लाळघोटेपणा देखिल आहे. महाराष्ट्राला मोठं बनवायचं असेल तर दिल्लीचं ओझं झटकायची ताकद हवी. ती ताकद महाराष्ट्रात होती आणि आहे हे साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवछत्रपतींनी देखिल दाखवलं होतं, आणि पन्नासवर्षांपूर्वी १०६ हुतात्म्यांनी देखिल.

    महाराष्ट्राला राज्यपातळीवरचाच पक्ष योग्य ठरेल. राष्ट्रिय पातळीवरचे पक्ष माती करतात. आत्ताच नाहि का भाजपाने ऐन १ मे चा मुहुर्त साधुन वेगळ्या विदर्भाची मागणी लावुन धरली? कॉंग्रेस तर काय पहिल्यापासून उघड महाराष्ट्रविरोधीच होता....आजहि आहे. शिवाय पक्ष राज्यपातळीवरचा असला कि कानपिचक्या लवकर देता येतात कारण इथला बाजार उठला तर दुसरीकडे थारा नाहि हे त्यांनाहि कुठेतरी माहित असते.

    थोडक्यात गोनीदा म्हणाले तसे "ज्याने महाराष्ट्राने लोभ केला, त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता तो भोळाहि आहे. आतिथ्यशिल आहे, किंबहुना तो आहे, गिरीशिखरांच्या दैवतासारखा, संतापला तर त्रिभुवने पेटवील... संतुष्ट झाला तर कारुण्याची गंगा वाहविल."

    ReplyDelete
  6. क्या बात है सौरभ झकास...म्हणूनच त्याला कळकळीची विनंती!!

    ReplyDelete
  7. eteehas sakshidar ahe,to asach kankhar hota aahe n rahil yaat shankach nako.tyachyakade aadarsh asha susauskruticha,manusakicha pan.. prasangi kankharteche hukmi shauryastrahi aahe.khar tar aapalyalach kadhikadhin glaniche dohale lagtat......asech kankhar banyane lihit raha abhimanane mann bharun yeta...
    dev nandini.pune.

    ReplyDelete