Friday, April 30, 2010

असे जगावे

‘कधी शब्द आले सुरांनीच न्हाले
मलाही न कळले कसे गीत झाले’
मला गाणी कशी सुचतात या प्रश्नाचं उत्तर मी अनेकदा या शब्दांत देतो. माझ्या काही गाण्यांनी भरभरुन आनंदासोबत मानसिक आधार, प्रेरणा, जगण्याला दिशा दिली अशा आशयाच्या प्रतिक्रिया रसिक श्रोत्यांनी पत्र, ई-मेल्स, फोनच्या माध्यमातुन तसंच प्रत्यक्षात भेटुनही दिल्या. अनेकांना त्यातल्या ओळी वाचताना मी philosopher प्रमाणे तर कित्येकाना psychatrist प्रमाणे वाटलो काहींनी यातल्या ओळी शब्द सुविचाराप्रमाणे लिहुन भिंतीवर लावले. या प्रतिक्रिया मलाही थक्क करणा-या होत्या. त्यातलीच काही निवडक गाणी..जगण्याकडे पहायची सकारात्मक नजर देणारी.!


असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती जमीनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर


करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
-गुरु ठाकूर.

3 comments:

 1. करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
  गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
  स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
  नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

  खूप छान गुरु.

  ReplyDelete
 2. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.. देव आनंद आठवला. खुप छान कविता आहे गुरु, असेच लिहित जा. जोपर्यंत आपण साहित्य सागरात तळाशी जाण्याचा प्रयत्न करीत राहू तो पर्यंत तुला कवितेचे मोती असेच मिळत राहतील.

  ReplyDelete
 3. mala aawadlelya kavitanpaiki ek.navya pidhilach nahi tar thodya adhichya paidhilahi ghadawnyach,sawarnyache samarthya tumchya lekhnit aahe.aapli susauskrut pratibha ashich jagaruk theva. asha adarsh 'fawarnichi' garaj astech margalalelya pikanna!.....
  dev nandini.pune.

  ReplyDelete