Friday, April 30, 2010

तव तेज या तिमिरात दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे...

सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आकाश ज्यांचे हो तयांचा संगती
करिती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे...

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखात या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे...


मी फार दैववादी वगैरे नाही. देवाकडे सतत काहितरी मागण्यासाठी
देवळाबाहेर रांगा लावून उभ्या रहाणा-या आणि नशिबाच्या नावाने
खापर फोडणा-या मंडळींची मला मनस्वी चीड आहे.
केवळ कर्मयोग मानणा-या मला, जेव्हा
’जर तुम्हाला देव भेटला तर काय मागाल?’
किंवा काय मागावं यावर गाणं लिहून हवंय्,
असं सांगण्यात आलं, तेव्हा हेच शब्द सुचले.

- गुरु ठाकूर

6 comments:

  1. wahhh...Guru....lekhani divasen divas...kay pailu padat aahe....masta aavadali...

    ReplyDelete
  2. oye shivaji, pura uparse gaya, bouncer. dont mind boss. but i think wht u write is awesome or so it seems. but hum jaise english medium walon ka kya? can the next generation keep up with this kind of alankarit marathi. i guess man udhan varyache is a hit more bcos of its simplicity rather than anything else. je dokyala kalte te hridayala bhidte.

    ReplyDelete
  3. agdi 'tya 'kalatle shabd punha navyane janmala
    yeun samor thakle n magchya janmatle dhusar gandh bharbharun darwalale.....
    dev nandini pune.

    ReplyDelete
  4. हो तुम्ही एकदम बरोबर बोलता सर ...दैववादी असन्यापेक्षा प्रयत्नावादी असलेले जास्त चांगले..मला असे वाटते मंदिराबहेर रांगा लायून देवाकडे काही मागण्यापेक्षा त्याचे सर्वाने आभार मानले पाहिजेत कि त्याने आपल्यला एवढे सुंदर जीवन दिले आहे अणि ते कसे फुलवायाचे ह्याचा सर्वाने प्रयत्न केला पाहिजे.कारन प्रयत्नांती परमेश्वर :)

    ReplyDelete
  5. Hi गुरु,
    हि प्रार्थना "कुलवधू" मालिकेत पहिल्यांदा ऐकली तेंव्हाच मनात घर करून राहिली. नंतर कधी पाठ होऊन गेली कळलंच नाही. म्हणलं इतकी सुंदर प्रार्थना कोणी लिहिली असेल? मालिकावाले सुद्धा टायटल सॉंग सोडून बाकी कोणत्या गीतांची नोंद श्रेयनामावलीत करत नाहीत. त्यामुळे हे तुम्ही लिहिलंय हे कळलंच नाही. पण आज कळलं, खूप आनंद झाला. तुमच्या लेखणीला शब्दांचं बळ असच मिळूदे, प्रतिभेची झळाळी लाभू दे.-संपदा

    ReplyDelete
  6. Hi Guru

    I like your songs very much - Tumhi ek pratibhavant kalakar aahat

    Tumcha blog baghun mast vatale -
    asech chan lihit raha :)

    ReplyDelete